|

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

महाराजस्व अभियान २०२६ : तुळजापूर शिबीर २८ जुलै | सर्व विभाग सेवा

🌿 श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान २०२६

📍 तुळजापूर विधानसभा मतदारसंघ · ता. तुळजापूर, जि. धाराशिव
🙏 सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत !

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Samadhan Shibir 2026) आयोजित करण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यात हा शिबीर दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता वंश मंगल कार्यालय, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे होणार आहे.

या शिबिराचा मुख्य उद्देश — शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे व नागरिकांच्या महसूल, कृषी, आरोग्य, सहकार, शिक्षण, बँकिंग, पुरवठा आणि इतर विविध विभागीय समस्या स्थळावरच सोडवणे. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी या शिबिरात उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन व त्वरित सेवा देतील.
📢 तहसीलदार, तुळजापूर यांनी सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सर्व नागरिकांनी आपल्या समस्या व कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
📅 २८ जुलै २०२६ सकाळी १०:०० 📍 वंश मंगल कार्यालय, नळदुर्ग रोड, तुळजापूर 📞 दूरध्वनी : ०२४७१-२४२०२७

🛕 महाराजस्व अभियान · विभागनिहाय सेवा

#विभागाचे नावशिबीरामध्ये देण्यात येणारे लाभाचे विवरण
🌾 कृषी विभागयोजना व सेवा : विगाणे वाटप, कृषी योजनांची माहिती, पीक प्रात्यक्षिके, गृहीत आरोग्य पत्रिका, पीक विमा योजना, कृषी अवजारे अनुदान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व इतर कृषी योजनांची माहिती.
🏙️ नगर परिषद
(नळदुर्ग व तुळजापूर)
नागरी सुविधा : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) / घरकुल योजना, मालमत्ता कर व पाणीपट्टी संदर्भातील मार्गदर्शन, जन्म-मृत्यू दाखले, स्वच्छता व नागरी सुविधा योजनांची माहिती, पी.एम. स्वनिधी (PM SVANidhi) इत्यादी.
🐄 पशुसंवर्धन विभागपशुधन सेवा : पशुधन लसीकरण, कृत्रिम रेतन, पशुरोग तपासणी, पशुपालकांसाठी अनुदान योजना, शेळी-कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय योजनांची माहिती.
🤝 सहायक निबंधक, सहकारी संस्थासहकार क्षेत्र : कर्जमुक्त लाभार्थी, सहकारी संस्थांची नोंदणी, सभासदत्व, पतसंस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), सहकारी योजनांचे मार्गदर्शन.
🏥 तालुका आरोग्य अधिकारीआरोग्य सेवा : मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना, लसीकरण, माता-बाल आरोग्य सेवा.
👩‍👧 महिला व बालविकासमहिला व बालकल्याण : अंगणवाडी सेवा, ASHA व आरोग्यसेविका मार्गदर्शन, महिला बचत गट, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, बाल संरक्षण सेवा, किशोरी विकास कार्यक्रम, महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास.
📮 पोस्ट विभागबचत व विमा : डाक जीवन विमा (PLI), ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI), सुकन्या समृद्धी खाते, वरिष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना (MIS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), इतर बचत योजना.
🏦 स्टेट बँक ऑफ इंडिया, तुळजापूरबँकिंग व कर्ज : पीक कर्ज मंजुरी व वितरण, पीक कर्जाचे नूतनीकरण, किसान क्रेडिट कार्ड (KCC) मंजुरी, पीक कर्जावरील व्याज सवलत, शेती यांत्रिकीकरणासाठी कर्ज, फळबाग व बागायती विकास कर्ज, पीक विमा व कृषी विमा मार्गदर्शन.
🏡 पंचायत समितीग्रामीण विकास : घरकुल मंजुरी, प्रलंबित लाभार्थी प्रकरणांचा निपटारा, नवीन पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन.
इतर सेवा : जॉब कार्ड नोंदणी व वाटप, रोजगार उपलब्धता, मजुरी देयक तक्रार निवारण, जन्म-मृत्यू-विवाह नोंदणी, ग्रामपंचायत कर व दाखले, ग्रामविकास योजना, अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास घटकांसाठी योजना, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक योजना.
१०📚 गट शिक्षण कार्यालयशिक्षण विभाग : आरटीई (RTE) २५% प्रवेश योजना, शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचे शिक्षण, आधार लिंक व विद्यार्थी नोंदणी, शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षण.
११🗺️ भूमि अभिलेख, तुळजापूरजमीन अभिलेख : जमिनीची मोजणी, हद्द कायम, फाळणी नकाशे, गाव नकाशे, फेरमोजणी, भू-अभिलेख नकाशे व अभिलेख, ई-नकाशा सेवा, जमिनीच्या क्षेत्रफळातील तफावत, महसूल विभागाशी समन्वय, मोजणी शुल्क व ऑनलाईन अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन.
१२🚌 राज्य परिवहन महामंडळ (ST)प्रवास सवलत व सेवा : ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व विद्यार्थी प्रवास सवलत. मासिक / त्रैमासिक वाहन पास, शिवशाही, शिवनेरी व इतर बस सेवांची माहिती, ऑनलाईन तिकीट बुकिंग, तक्रार निवारण. स्वतंत्र “एस.टी. सेवा कक्ष” उभारण्यात येईल.
१३🛒 पुरवठा विभागअन्नसुरक्षा : अन्नसुरक्षा योजनेत सर्व लाभार्थींचा समावेश, प्राप्त अर्जांची त्वरित पडताळणी व इष्टांकाच्या मर्यादेत समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका त्वरित वितरण. सर्व रास्त भाव दुकानदार यांनी शिबिरात उपस्थित राहावे.
१४💻 महसूल (संगायो / इंगायो) विभागनवीन व प्रलंबित प्रकरणे : नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, अपूर्ण अर्ज पूर्ण करणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, पात्रांना मंजुरी आदेश देणे, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा, बँक खाते-आधार-मोबाईल लिंकिंग पूर्तता, बंद/रखडलेली प्रकरणे पुन्हा सुरू करणे.
१५📄 संकीर्ण विभाग (प्रमाणपत्रे)दाखले व प्रमाणपत्रे : रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (नवीन अर्ज व वितरण), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास (Domicile) प्रमाणपत्र. सर्व अर्ज स्वीकारणे, पोहच देणे व नोंद रजिस्टर ठेवणे, विभागनिहाय अर्जाचे वाटप करणे.
१६📋 आवक-जावक / नोंदणी विभागनोंदणी व मार्गदर्शन : विविध विभागांच्या अर्जांची नोंदणी, पोहच वितरण, संदर्भ पत्रिका, लाभार्थ्यांना मार्गदर्शन, जन्म-मृत्यू विवाह नोंदणी, तसेच इतर प्रशासकीय सेवा.
१७📜 जमीन क्षेत्र / महसूल (७/१२)भूमी व वारसा : जिवंत ७/१२ मोहिम, वारसा नोंद, नाव दुरुस्ती / क्षेत्र दुरुस्ती, तुकडेवंदी कायद्याअंतर्गत मार्गदर्शन, ऑनलाईन महसूल सेवांबाबत मार्गदर्शन.
१८📜 दुय्यम निबंधक (Duyyam Nibandhak)नोंदणी व मुद्रांक सेवा : दस्त नोंदणीसंदर्भातील मार्गदर्शन, मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क, ई-नोंदणी, दस्तांच्या प्रमाणित प्रती, कौटुंबिक वाटणीपत्र, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन, तक्रार निवारण, जनजागृती. स्वतंत्र “नोंदणी व मुद्रांक सेवा कक्ष”.
१९👮 पोलीस स्टेशन, तुळजापूरपोलीस सेवा : पोलीस पडताळणी, हरवलेली कागदपत्रे, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक सुरक्षा, सायबर गुन्हे, वाहतूक जनजागृती, अंमली पदार्थ व व्यसनमुक्ती, जनजागृती, बाल संरक्षण, सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था, तक्रार निवारण. स्वतंत्र “पोलीस सेवा कक्ष”
Share Buttons – Small Square
जॉईन करा · नोकरी वार्ता
वाचकांनो, ‘नोकरी वार्ता’ चे चॅनेल जॉईन केले आहे का?
अजून नाही? तर लगेच खालील बटणावर क्लिक करा आणि सर्व सरकारी नोकऱ्यांचे ताजे अपडेट्स ‘नोकरीवार्ता’ वर थेट मोबाईलवर मिळवा!

📌 Related Posts