माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; 1000 अधिसंख्या पदांना मंजुरी
माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्तीसाठी 1000 अधिसंख्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस, वन, अग्निशमन, राज्य उत्पादन शुल्क यांसह विविध विभागांमध्ये माजी अग्निवीरांना संधी मिळणार असून विभागनिहाय पदसंख्या व नियुक्तीची कार्यपद्धती लवकरच निश्चित केली जाणार आहे.



