| | |

महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना 2026 – Mahila Shetkari Pramanpatra Yojana 2026 | Eligibility, Benefits & Online Apply

Mahila Shetkari Certificate Yojana 2026

Mahila Shetkari Pramanpatra Yojana 2026 : महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना ही महाराष्ट्र शासन मार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेती व शेतीपूरक क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देऊन त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येते . जमिनीच्या मालकीची अट न ठेवता शेती कार्यात सहभागाला प्राधान्य देण्यात आले आहे .


महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना 2026 – Mahila Shetkari Pramanpatra Yojana 2026 | पात्रता, फायदे व Online Apply

📌 Yojana Overview / योजनेची थोडक्यात माहिती

माहितीतपशील
Yojana Name / योजनेचे नावमहिला शेतकरी प्रमाणपत्र योजना, २०२६ (महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत)
Launched By / सुरू करणारेमहाराष्ट्र सरकार (कृषी विभाग)
Department / विभागकृषी विभाग, महाराष्ट्र शासन
Beneficiary / लाभार्थीशेती व शेतीपूरक कार्यात कार्यरत महिला (वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक)
Benefits / योजनेचा लाभमहिला शेतकरी प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, पीक विमा, विस्तार सेवा
Apply Mode / अर्ज पद्धतOnline (कृषी विभागाचे पोर्टल) आणि Offline (ग्रामपंचायत / नगरपंचायत)
Official Websiteकृषी विभाग, महाराष्ट्र शासन संकेतस्थळ

🎯 Benefits / योजनेचे फायदे

  • ✅ महिला शेतकरी म्हणून अधिकृत ओळख – जमिनीच्या मालकीशिवाय शेती करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळते .
  • ✅ महिला शेतकरी प्रमाणपत्र – पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र दिले जाते, जे अधिकृत ओळखपत्र म्हणून कार्य करते .
  • ✅ शासकीय योजनांचा लाभ – कृषी योजना, अनुदान, सब्सिडी व सेवांचा लाभ सुलभतेने मिळतो .
  • ✅ कृषी कर्ज व पतकर्ज सुविधा – संस्थात्मक कर्ज व पतकर्ज मिळण्यास मदत होते .
  • ✅ पीक विमा – पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो .
  • ✅ कृषी निविष्ठा व विस्तार सेवा – बियाणे, खते व कृषी विस्तार सेवांचा लाभ .
  • ✅ बाजारपेठ सुविधा – शेतमाल वाहतूक, साठवणूक व खरेदी-विक्रीशी संबंधित सुविधा .
  • ✅ कौशल्य विकास – प्रशिक्षण व नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत .
  • ✅ एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहाय्य – विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी विशेष कार्यक्रम .

👥 Eligibility / पात्रता – You Are Eligible If…

०१. महिला शेतकरी (Female Farmer)

अर्जदार महिला असावी आणि जमीन मालक, वैध भाडेकरू, बटाईदार, कुळ शेतकरी, शेतमजूर किंवा बटाईदार यापैकी कोणत्याही स्वरूपात शेती कार्यात सक्रियपणे गुंतलेली असावी.

०२. महाराष्ट्राची रहिवासी (Maharashtra Resident)

अर्जदार महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी आणि तिच्याकडे वैध अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असावे.

०३. वैध आधार कार्ड (Valid Aadhaar Card)

अर्जदाराकडे वैध आधार कार्ड असावे आणि ते सक्रिय मोबाईल नंबरशी लिंक असावे. सर्व लाभ आधार-लिंक्ड बँक खात्यात transfer केले जातात.

०४. समाविष्ट कार्य प्रकार (Covered Work Type)

अर्जदाराने केले जाणारे शेती कार्य या योजनेअंतर्गत समाविष्ट कार्य प्रकारांपैकी एक असावे – पीक शेती, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय इत्यादी.

०५. वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक (Age 18 Years and Above)

अर्ज करण्याच्या दिनांकाप्रमाणे अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

👥 Other Eligibility / इतर पात्रता

  • ✔️ महाराष्ट्राची रहिवासी असलेली महिला .
  • ✔️ वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे .
  • ✔️ ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात रहात असावी .
  • ✔️ शेती किंवा शेतीपूरक कार्यात कार्यरत असावी – पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, मासेमारी, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी-वनीकरण, चराई व्यवसाय, कंपोस्ट खत निर्मिती इत्यादी .
  • ✔️ स्वतःची शेतजमीन नसली तरी पात्र – भाडेपट्ट्याने, बटाईने किंवा दुसऱ्याची जमीन तोंडी/लेखी करार करून शेती करणाऱ्या महिलाही पात्र .
  • ✔️ शेतमजूर, रोजमळा मजूर किंवा पशु चारक (गुराखी) – कृषी कार्याधारक असल्यास पात्र .
  • ✔️ वर्षातील किमान एका हंगामात महाराष्ट्रात शेती करणाऱ्या स्थलांतरित महिला – पात्र .
  • ✔️ शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन करणाऱ्या महिला – पात्र .

📄 Required Documents / आवश्यक कागदपत्रे

  • Aadhaar Card / आधार कार्ड
  • Mobile Number / मोबाईल नंबर
  • Bank Account Details / बँक खाते
  • Voter ID / मतदार ओळखपत्र किंवा PAN Card
  • Address Proof / पत्ता पुरावा – रेशन कार्ड, वीज बिल किंवा स्थानिक रहिवाशी पुरावा
  • Land Ownership Proof / जमीन मालकीचा पुरावा – ७/१२ आणि ८-अ चा उतारा (असल्यास)
  • Agricultural Proof / शेती करारनामा, भाडेपट्टा (असल्यास)
  • Self Declaration / स्वयंघोषणापत्र
  • [इतर आवश्यक कागदपत्रे – विहित नमुन्यानुसार]

📝 How to Apply / अर्ज कसा करावा?

Step 1: कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा किंवा ग्रामपंचायत / नगरपंचायत कार्यालयात जा .

Step 2: महिला शेतकरी प्रमाणपत्र निवडा.

Step 3: Online Apply / Registration वर Click करा .

Step 4: आधार क्रमांक, जिल्हा, तालुका व गावाची माहिती भरा .

Step 5: आवश्यक कागदपत्रे Upload करा (आधार, पत्ता पुरावा, जमीन कागदपत्रे इत्यादी).

Step 6: Application Form Submit करा.

Step 7: अर्ज ग्रामसभा / नगरपंचायत समोर ठेवला जाईल .

Step 8: ग्रामसभा / नगरपंचायत अर्जदार किमान एक शेती कार्य करीत आहे किंवा कसे याची पडताळणी करून ठराव संमत करेल .

Step 9: मान्यता दिल्यास १५ दिवसांच्या आत पदनिर्देशित अधिकारी महिला शेतकरी प्रमाणपत्र देईल .

Step 10: नाकारल्यास ७ दिवसांच्या आत नाकारण्याची कारणे, अपील कालावधी व अपील अधिकाऱ्याचा तपशील लेखी कळविला जाईल .

Step 11: अपील करायचे असल्यास १२० दिवसांच्या आत अपील अधिकाऱ्याकडे अपील दाखल करा .

Step 12: अपील अधिकारी ३० दिवसांच्या आत सकारण आदेशासह निकाल देईल .

Step 13: प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महिला शेतकरी आधारसामग्री (डेटाबेस) मध्ये नोंद होईल .


🔗 Important Links / महत्वाच्या लिंक्स

LinkDetails
🟢 Online ApplyApply Link
🔵 Official WebsiteOfficial Link
🟡 Government GR / NotificationGR Link
🔴 Application StatusStatus Link
🟠 Webinar / मार्गदर्शनYouTube Live
🟡महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ माहिती पुस्तिकाClick Here
🔔आमच्या ग्रुपला जॉईन करा / Join Our Groups

Latest Government Jobs, Yojana Updates, Bharti, Recruitment, Result, Hall Ticket, Previous Year Question Papers(PYQ), सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि Current Affairs Updates साठी NaukriVarta Group मध्ये Join व्हा..


ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य आणि पात्र लाभार्थ्यांसोबत WhatsApp, Telegram, Facebook वर Share करा.

↗ Share
WhatsApp ➤ Telegram

📤 Share करा आणि गरजूंपर्यंत सरकारी योजनेची माहिती पोहोचवा.


❓ FAQ – Frequently Asked Questions

1. What is Mahila Shetkari Pramanpatra Yojana 2026?

महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना, २०२६ ही महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे. याद्वारे शेती व शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता व प्रमाणपत्र दिले जाते .

2. Who can apply for this scheme?

महाराष्ट्राची रहिवासी असलेली, वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असलेली, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात राहणारी आणि शेती किंवा शेतीपूरक कार्यात कार्यरत असलेली कोणतीही महिला पात्र आहे .

3. What are the benefits of this scheme?

महिला शेतकरी प्रमाणपत्र, कृषी योजनांचा लाभ, कृषी कर्ज, पीक विमा, कृषी निविष्ठा व विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, कौशल्य विकास, एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहाय्य इत्यादी लाभ मिळतात .

4. How to apply for Mahila Shetkari Pramanpatra Yojana?

कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा किंवा ग्रामपंचायत / नगरपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करावा. अर्ज ग्रामसभा / नगरपंचायत समोर ठेवला जाईल. मान्यता दिल्यास १५ दिवसांच्या आत प्रमाणपत्र दिले जाते .

5. What documents are required?

आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते, मतदार ओळखपत्र / PAN, पत्ता पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल), जमीन कागदपत्रे (७/१२, ८-अ – असल्यास), शेती करारनामा / भाडेपट्टा, स्वयंघोषणापत्र इत्यादी .

6. What if my name is not on the land title (7/12)?

जमिनीच्या उताऱ्यावर नाव नसले तरीही शेती किंवा शेतीपूरक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असल्यास महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकते. जमीन मालकी हा एकमेव निकष नाही .


Mahila Shetkari Certificate Yojana

📌 Important Note / महत्वाची सूचना

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ दिनांक २२ जुलै, २०२६ रोजी लागू करण्यात आला आहे . १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून पात्र महिलांनी या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . अर्ज करण्यापूर्वी Official Website / Government Notification वर दिलेली पात्रता, अटी व नियम तपासावेत. योजनेच्या नियमांमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेत बदल होऊ शकतो.

📌 NaukriVarta.in – Latest Government Jobs, Bharti, सरकारी योजना (Sarkari Yojana), Result, Hall Ticket आणि Current Affairs Updates

📌 Related Posts